
मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) थैमान घातल आहे. आत्ता कुठेतरी हे वातावरण शांत झालेलं होत. पण पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. चीन, अमेरिका, ब्राझील आणि जपानमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. माहितीनुसार, देशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 131 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्शवभूमीवर भारत सरकार देखीलअलर्ट झालं असून राज्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील काही प्रमुख मंदिरात आजपासून मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.
गायरान जमीन म्हणजे नेमके काय? वाचा याबद्दल सविस्तर माहिती
याच पार्शवभूमीवर शिर्डीतल्या साईबाबा संस्थाननेही सतर्कतेचे उपाय सुरु केले आहेत. साईबाबांच्या दर्शनाला येणार्या भक्तांनी आता मास्क लावून दर्शनाला यावे असे साईबाबा संस्थानने आवाहन केलं आहे. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला येणार्या भक्तांनी मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, त्याचबरोबर सोशल डिस्टनसिंगचा वापर करावा. ज्या लोकांनी बूस्टर डोस घेतले नसतील अशा लोकांनी लवकरात लवकर बूस्टर डोस घ्यावेत.
भारतात पुन्हा कोरोना येणार? वाचा डॉ.रवी गोडसे यांची प्रतिक्रिया
त्याचबरोबर कोल्हापुरमधील महालक्ष्मी मंदिरात देखील शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. आणि दुसरीकडे पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी येताना मास्क घालून यावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.