Corona Cases Maharastra । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! महाराष्ट्रामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; पुन्हा लॉकडाऊन?

Corona Cases Maharastra

Corona Cases Maharastra । सध्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे टेन्शन वाढवणारी ही बातमी आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

Japan Earthquake Viral Video । घरांची पडझड, लोकांची पळापळ, एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के; भयानक व्हिडीओ समोर

माहितीनुसार, अहमदनगरमधील दोन विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. तीन दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. यामध्ये त्यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आ. हे यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.

Navi Mumbai । धक्कादायक प्रकार! ट्रक चालकाने पोलिसांना दगडाने आणि बांबूने केली जबर मारहाण

नाशिक मध्ये आढळले कोरोनाचे रुग्ण

नाशिक शहरांमध्ये देखील कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे तीन रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे. त्या रुग्णांवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून दोन जण घरीच क्वारंटाईन आहेत. यामुळे आता आरोग्य विभाग सतर्क झाला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Mumbai-Nashik Expressway । नाशिक-मुंबई महामार्गावर अतिशय भीषण अपघात! पाच जण गंभीर जखमी

Spread the love