Dharashiv News । धाराशिवमध्ये तुंबळ हाणामारी! पाच जखमी तर 125 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

Dharashiv News

Dharashiv News । धाराशिव : एकीकडे राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असताना आता धाराशिवमधून (Dharashiv) एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. धाराशिवमध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एका यु ट्यूब चॅनलच्या पत्रकाराने जमाव भडकवल्याचा आरोप करण्यात येत असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Latest marathi news)

Topers Ad

Satara Loksabha । उदयनराजेंविरोधात बिचुकले लोकसभेच्या मैदानात! साताऱ्यात होणार कांटे की टक्कर

सोमवारी रात्री खाजा नगर आणि गणेश नगर भागात हा धक्कादायक प्रकार घडला असून अज्ञात कारणाने दोन गट आमने सामने आले. त्यानंतर त्यांच्यात दगडफेक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडया फोडत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Crime News । छ. संभाजीनगर हादरलं! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आईला पाठवला धक्कादायक व्हिडीओ

या वादानंतर पोलिसांनी कारवाईला सुरवात केली असून पोलिसांकडून 307 व इतर कलम अंतर्गत जवळपास 125 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दगडफेकीमुळे अनेक वाहनाचे, दुकानाचे नुकसान झाले आहेत. या घटनेत 4-5 लोकं जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहे.

Loksabha election । काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! पत्नीला तिकीट न दिल्याने ‘या’ आमदाराने दिला तडकाफडकी राजीनामा

Spread the love