नागरिकांना आता घरुनही मतदान करता येणार! इतिहासात पहिल्यांदाच घरून मतदानाचा उपक्रम यशस्वी…

Citizens can now vote from home! For the first time in history, the initiative of voting from home was successful...

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘घरून मतदान’ हा उपक्रम मुंबईमध्ये यशस्वी झाला आहे. मुंबई उपनगर मधील ‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया गुरुवारी ( दि.3) पार पडली. यामध्ये हा उपक्रम राबविण्यात आला होता.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील लवकरच दौंड दौऱ्यावर; राहुल कुल यांनी घेतली भेट

80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीत असणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत जेष्ठ नागरिकांनी घरूनच मतदान ( Voting from Home) केले. अंधेरी पूर्व मतदान संघातील 91 टक्के जेष्ठ मतदारांनी याद्वारे मतदान केले आहे.

 विहीरीसाठी अनुदान मिळवणे झाले आणखी सोप्पे! सरकारने ‘ही’ अट रद्द केल्याने शेतकऱ्यांना होणार फायदा

यासाठी ऑक्टोंबर महिन्यातच 80 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांची एक स्वतंत्र यादी बनवण्यात आली होती. यामध्ये 7000 मतदारांचा समावेश होता. परंतु त्यापैकी फक्त 430 मतदारांनी घरून मतदान करण्यासाठी सहमती दर्शवली होती.

शरद पवारांवर रुग्णालयात नक्की कोणते उपचार सुरू आहेत? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं

घरून मतदान करणाऱ्या मतदारांसाठी मतदारसंघातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत तात्पुरते मतदान केंद्र बनविण्यात आले होते. या मतदान केंद्रात जेष्ठ व्यक्तींनी आपले मत ‘गुप्त मतदान’ पद्धतीने नोंदविले. देशाच्या निवडणूक पहिल्यांदाच ‘घरून मतदान’ हा उपक्रम एवढा यशस्वी झाला आहे.

राजू शेट्टी शरद पवारांवर भडकले! शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा केला आरोप

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *