Dinesh Phadnis । मनोरंजनसृष्टीवर शोककळा! ‘सीआयडी’ फेम अभिनेत्याचं निधन

Dinesh Phadnis

Dinesh Phadnis । अभिनेते दिनेश फडणीस ‘सीआयडी’ (CID) या मालिकेच्या माध्यमातून अगदी घराघरांत पोहोचले. आपल्या विनोदी शैलीने त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. (CID fame Dinesh Phadnis) परंतु, ही मालिका पाहणाऱ्या सर्वांना आता एक मोठा धक्का बसला आहे. कारण हा अभिनेता आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिनेश फडणीस यांची प्रकृती अचानक खराब झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. (Dinesh Phadnis Death)

Crime News । हृदयद्रावक घटना! नवऱ्यानेच केली बायकोची हत्या, मृतदेह ड्रममध्ये भरून जंगलात फेकले

उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वयाचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीला खूप मोठा धक्का बसला आहे. सीआयडी या मालिकेशिवाय ते ‘सरफरोश’ आणि ‘सुपर 30’ या सिनेमात (Dinesh Phadnis Movies) झळकले आहेत. ‘अदालत’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकांमध्ये त्यांनी इंस्पेक्टर फ्रेड्रिक्सची (Fredericks) भूमिका बजावली असून ‘सीआयएफ’ या मालिकेत ते कांस्टेबल शंभू तावडेच्या भूमिकेत होते. (Latest Marathi News)

Accident News । ब्रेकिंग! स्कुल बसचा भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घडली घटना

दिनेश फडणीस यांच्यावर Tunga रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या बद्दल माहिती मिळता CID मालिकेतील अनेक कलाकारांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. CID या मालिकेत त्यांनी तब्बल 20 वर्षे काम केले. दिनेश यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. ते सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय होते, त्यांचे इंस्टाग्रामवर 88.9k फॉलोअर्स आहेत.

Pune News । ब्रेकिंग! पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा अखेर जमीनदोस्त

Spread the love