chhota rajan news । ब्रेकिंग! दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अजून जिवंत; ९ वर्षांनी फोटो आले समोर

chhota rajan news

chhota rajan news । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असल्याचे चित्र समोर आले आहे. जवळपास 8 वर्षांपासून तिहार तुरुंगात बंद असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अजूनही दाऊद इब्राहिमला मारण्याच्या प्रयत्नात आहे. अंडरवर्ल्ड डॉनचे दोन फोटो समोर आले आहेत.

Sharad Pawar । पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीवर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य!

दोन फोटो समोर आले असून एका फोटोमध्ये छोटा राजन रुग्णालयामधील कारागृहात आहे. त्याला 2020 मध्ये कोरोना झाला असताना रुग्णालयात दाखल असतानाचा हा फोटो आहे. तर दुसरा फोटो आताचा असल्याचे बोलले जात आहे. जवळपास नऊ वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

गांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या वतीने डॉ.दिपक दादाराव जाधव यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान भव्य सोहळा पुणे येथे संपन्न!

छोटा राजनचा कोरोना काळात मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र छोटा राजन जिवंत असल्याचा हा पुरावा सोशल मीडियावर आता झळकला आहे. यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. दरम्यान, सध्या छोटा राजन दिल्लीच्या तिहार जेलमध्ये असून त्याला 2015 साली बाली विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्याला तिहार जेलमधील २ नंबरच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे.

Rakhi Sawant । सर्वोच्च न्यायालयाचा राखी सावंतला मोठा धक्का! दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

Spread the love