Chhatrapati Shivaji Maharaj । छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे.
Apple iPhone 16 | गुडन्यूज! ‘या’ तारखेला लॉन्च होणार आयफोन 16?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “झालेली घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता आणि त्याचे पूर्ण डिझाईन नेवीने तयार केले होते. मला कलेक्टरने सांगितले की, पुतळ्याच्या नुकसानाचे मुख्य कारण म्हणजे ताशी 45 किमी वेगाचा वारा. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचे नुकसान झाले आहे.”
Politics News । राजकारणात मोठा भूकंप? महायुतीचे बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले की, उद्या नेवीचे अधिकारी घटनास्थळी येणार आहेत. “आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी गेले आहेत आणि त्यांनी तात्काळ पुनरुत्थानाची सूचना केली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार वैभव नाईक यांनी या घटनेनंतर मालवणमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत, हे सर्वांनी मान्य केले पाहिजे, पण कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही. कायदा-सुव्यवस्था राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.”