Chhatrapati Sambhaji Nagar Crime। डॉक्टर हॉस्पिटलमध्ये कपड्यांशिवाय फिरत होता, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Chhatrapati Sambhaji Nagar Crime

Chhatrapati Sambhaji Nagar Crime । सध्या एका सरकारी रुग्णालयातून एका डॉक्टरचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. गेल्या दोन- तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराचा असल्याचा दावा केला जात आहे.

Delhi Borewell Accident । धक्कादायक बातमी! खेळता-खेळता चिमुकला ४० फूट बोअरवेलमध्ये पडला; पाहा व्हिडीओ

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक डॉक्टर विवस्त्र अवस्थेत हॉस्पिटलमध्ये फिरताना दिसत आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील बिडकीन ग्रामीण शासकीय रुग्णालयातील डॉक्टर कपड्यांशिवाय रुग्णालयात फिरत होते. (Chhatrapati Sambhaji Nagar Crime)

Sharad Pawar । लेकीच्या विजयासाठी शरद पवारांनी थोपटले दंड, २० वर्षांचे वैर विसरुन घेतली अनंतराव थोपटेंची भेट

45 वर्षीय डॉक्टर दारूच्या नशेत असताना कपड्यांशिवाय हॉस्पिटलमध्ये फिरत होते. या घटनेबाबत जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन तथा येथील आरोग्य सेवा प्रमुख डॉ.दयानंद मोतीपवळे यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यात येत असून दोषी आढळल्यास डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येईल.

Devendra Fadanvis । खळबळजनक! देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमातच महिलेचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर

ही सर्व घटना रुग्णालयामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र, रुग्णालयामधून कुणीतरी हा व्हिडीओ लीक केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे चर्चेत आहे.

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का! महिला नेता ठोकणार पक्षाला रामराम

Spread the love