चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त, बाळू धानोरकर यांच्या जागी कोण लढणार? ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

Chandrapur Lok Sabha seat vacant, who will contest in Balu Dhanorkar's place? The names of 'these' leaders are in discussion

मागच्या काही दिवसापूर्वी चंद्रपूरचे (Chandrapur) खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

सारा अली खान क्रिकेटरसोबत लग्न करणार? शुभमन गिलसोबत असलेल्या रिलेशनशिपच्या चर्चांवर केलं मोठं वक्तव्य; म्हणाली…

या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. सध्या काँग्रेसमध्ये लोकसभा पोटनिवडणुक लढविण्यासाठी सात नेत्यांची नावे चर्चेत आहेत. उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसने ऑनलाईन सर्वे केला आहे. त्यामुळे काँग्रेस कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत भाजपचाही उमेदवार उतरण्याची शक्यता असल्याने काँग्रेस या निवडणुकीकडे विशेष लक्ष देत आहे.

धक्कादायक! प्रेमात आडवा आला म्हणून, हातोड्याने केली प्रियसीच्या पतीची हत्या अन्…. वाचून तुम्हीही व्हाल थक्क

चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आमदार आमदार सुभाष धोटे, विनायक बांगडे, मनोहर पाऊणकर, विजय वडेट्टीवार, आमदार प्रतिभा धानोरकर, प्रकाश देवतळे आणि अनिल धानोरकर या सात नेत्यांची नावे चंद्रपूर लोकसभेसाठी चर्चेत आहेत.

घराच्या छतावर चढला चक्क बैल, त्यांनतर घडले असे की… व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *