गोवरबद्दल केंद्रीय आरोग्य विभागाने दिली ‘ही’ महत्वाची माहिती; वाचा सविस्तर

Central Health Department gave 'this' important information about measles; Read in detail

कोरोनाच्या महाभयंकर लाटेनंतर एक नवीन रोग महाराष्ट्रात शिरकाव करत आहे. महाराष्ट्रात गोवर हा संसर्गजन्य रोग आपले बस्तान बसवत आहे. राज्यात अचानकच गोवरच्या रुग्णांची संख्या वाढत असून याबाबत केंद्रीय आरोग्य विभागाने (central Health Department) राज्य आरोग्य विभागास पत्र पाठवले आहे. या पत्रात मुंबई, ठाणे व राज्यातील बारा जिल्हे धोक्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये कमी धोकादायक, मध्यम धोकादायक, अति धोकादायक व धोकादायक अशी वर्गवारी करण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेत उदयनराजे भावुक; म्हणाले, ‘मेलो असतो तर बर झालं असतं..’

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या यादीनुसार औरंगाबाद, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे या जिल्ह्यात गोवर या संसर्गजन्य रोगाची साथ पसरली आहे. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, हायड्रेशन, व्हिटॅमिन ए, पॅरासिटामॉल अशा उपचाराने हा आजार बरा होतो. याशिवाय हा आजार बरा होण्यासाठी लसीकरण देखील करु शकता.

“करायला गेला एक आणि झालं भलतंच”; मोराची अंडी चोरणाऱ्या माणसाचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाय का?

गोवरच्या रोग झाल्यास शरीरावर पुरळ दिसू लागतात. हा आजार एका विषाणूमुळे होतो. हा विषाणू थंड वातावरणात जास्त काळ तग धरतो. यामुळे हिवाळ्यमध्ये गोवरची साथ पसरते.

गोवर रोगाची लक्षणे
1) सुरवातीच्या दिवसांत सर्दी, ताप, खोकला जाणवतो.
2) अंगावर पुरळ उठायला सुरुवात होते.
3) भूक मंदावते.
4) पोटातल्या रसग्रंथी सुजल्यामुळे काही मुलांना पोटात दुखते.
5) ताप कमी होईल तश्या पुरळ कमी होता.

“करायला गेला एक आणि झालं भलतंच”; मोराची अंडी चोरणाऱ्या माणसाचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाय का?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *