
नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची आता पुढील प्रवेश घेण्यासाठी घाई गडबड सुरू होणार आहे. यासाठी सर्व कागपत्रांची जुळवाजुळव देखील काहींनी सुरू केली असेल. राज्यातील बहुतेक विद्यार्थ्यांना ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जागच्या जागी दाखले मिळत आहेत. अशातच आता जात पडताळणी कार्यालयाकडून एका दिवसात किंवा जास्तीत जास्त आठ दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र (Cast Validity Certificate) मिळणार आहे. पडताळणी समितीने याबाबतचे नियोजन केले आहे.
एका युजरला Sorry म्हणतं ChatGPT ठरली अपयशी, युजरने स्क्रीनशॉट केला व्हायरल!
यासाठी विद्यार्थ्यांना www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागेल. खरंतर जात प्रमाणपत्रासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
शरद पवार यांना मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता पक्ष सोडणार
१) संबंधित कॉलेजचे पत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड
२) अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का आणि अर्जदाराचा फोटो
३) अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला व पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा
४) अर्जदाराचा जातीचा दाखला झेरॉक्स प्रत
फ्री मध्ये करा घरबसल्या आधार कार्ड अपडेट, १५ जून पर्यंत शेवटची संधी
५) अर्जदाराच्या वडिलांचा शाळेचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला, वडील अशिक्षित असल्यास तसे शपथपत्र
६)) अर्जदाराची आत्या किंवा चुलत्याचा शाळा सोडल्याचा दाखला
७) अर्जदाराचे आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
८) इतर महसुली पुरावे (गाव न. सात, टॅक्स पावती, खरेदीखत, सहा-ड, फेरफार उतारा, गहाणखत, मालमत्तापत्रक)
९) वंशावळ नमुना नं. तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व फॉर्म नं. १७ (शपथपत्र).
भयानक! तब्ब्ल ६ वर्षांपासून आईच्या मृतदेहासोबत राहत होता, धक्कादायक कारणही आलं समोर