Cabinet Meeting । नवीन वर्षाचं शिंदे सरकारने दिलं मोठं गिफ्ट; घेतला मोठा निर्णय

Eknath Shinde

Cabinet Meeting । आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी नागपूर अधिवेशन दणाणून सोडणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी देखील एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2005पूर्वी शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का! कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी पक्षातील खासदाराला इन्कम टॅक्सची नोटीस

पाहा मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

१) नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. कर्मचाऱ्यांना दिलासा.

२) अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी २५० रुपये.

३) दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान.

४) विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार.

५) मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता.

६) पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान. ४०० उद्योगांना फायदा.

७) रेशीम उद्योगाच्या विकासासाठी “सिल्क समग्र २” योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ.

८) द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार.

९) नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता.

१०) सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला.

Spread the love