
Breaking News । मागच्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला अजूनही आरक्षण मिळाले नाही त्यामुळे मराठा बांधवा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 20 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर (Mumbai Azad Maidan) मोठे आंदोलन होणार असल्याची घोषणा देखील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. दरम्यान आता मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Congress । मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का बसणार; मुंबईतील बडा नेता शिंदे गटात जाणार
राज्य मागासवर्ग आयोगाकडून (State Backward Classes Commissions) मराठा समाजात मागासलेपण तपसायला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आयोगामार्फत जाहीर सूचना देखील देण्यात आली आहे. जर मराठा समाजाच्या मागासलेपणा बाबत काही सूचना करायची असल्यास 500 शब्दांच्या मर्यादेत 19 तारखेपर्यंत आयोगात पाठवण्यात यावे असे देखील सांगण्यात आला आहे. (Latest Marathi News )
दरम्यान, 20 जानेवारी रोजी मुंबईत मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर मोठे आंदोलन करणार आहेत. यासाठी संपूर्ण मराठा समाजाने मुंबईमध्ये दाखल व्हावे असे आव्हान देखील मनोज जरांगेपाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर काही झालं तरी मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे असे देखील ते म्हणाले आहेत.
Maratha Reservation । बिग ब्रेकिंग! जरांगेंच्या मुंबईतील सभेबाबत उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं