
उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफने झाशीमध्ये माफिया अतिक अहमदचा मुलगा असद याचे एन्काउंटर केले आहे. असद हा उमेश पाल हत्याकांडातील मुख्य आरोपी असून तो बऱ्याच दिवसांपासून फरार होता. उमेश पाल खून प्रकरणात असदचाच हात असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश हत्या प्रकरणात सहभागी असलेला गुलाम एन्काउंटरमध्ये मारला गेला.
अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत!
असद आणि गुलाम या दोघांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. असद अहमदला ठार केल्याबद्दल उमेश पालची आई शांती देवी आणि पत्नी जया पाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.
असद आणि गुलाम यांचे एन्काउंटर आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे एन्काउंटर झाशीपासून 7 किमी अंतरावर असलेल्या यूपीच्या झाशीच्या बरका गावात परिछा धरणावर झाले आहे.
गोमूत्र ठरतंय आरोग्याला हानिकारक! संशोधनात समोर आली धक्कादायक माहिती; वाचा सविस्तर