रिवॉल्ट मोटर्सची हटके इलेक्ट्रिक बाईक, फक्त 2499 रुपयांमध्ये बूक करा; फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Book Hatke Electric Bike by Revolt Motors for just Rs 2499; You will also be amazed by reading the features

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. याचा सर्वात जास्त फटका सामान्य माणसांच्या खिशाला बसत आहे. आजकाल तर पेट्रोलचे दरही गगनाला भिडत आहेत. यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांकडे लोकांचा ओढा वाढत आहे. दरम्यान बाजारात एक नुकतीच एक हटके बाईक आली आहे. बाईक पॉवर ( Bike Power) आणि नॉर्मल मोटारसायकलचा फील देणारा जबरदस्त पर्याय म्हणून ही बाईक खास ओळखली जाते.

अहमदनगरचे सुद्धा लवकरच नामांतर होणार? गोपीचंद पडळकर यांनी केली मागणी

रिवॉल्ट मोटर्सने ( Revolt motors) ही बाईक बाजारात आणली असून आरव्ही 400 असे या बाईकचे नाव आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या बाईकची किंमत 1.25 लाख इतकी असून सुरुवातीला फक्त 2499 रुपयांत ही बाईक बुक करता येणार आहे. रिवॉल्ट मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 31 मार्चपासून या मोटार सायकलची डिलिव्हरी सुरू होणार आहे. रिवॉल्ट मोटर्सच्या वेबसाईटवरून लॉगिन करून या बाईकचे बुकिंग करावे लागणार आहे.

कसबा पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे रात्री 8 वाजेपर्यंत पैसे वाटत फिरत होते; रवींद्र धंगेकरांनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी

आरव्ही 400 ( RV 400) बाईकची खास वैशिष्ट्ये

1) या बाईकमध्ये 3 किलोव्हॅटची मोटर असून या मोटरला 72 व्हॅटच्या 3.24 किलोव्हॅट लिथियम आर्यन बॅटरीचा सपोर्ट आहे.

2) आरव्ही 400 चा टॉप स्पीड 85 किमी प्रती तास इतका आहे.

3) या बाईकमध्ये माय रिवॉल्ट कनेक्टिव्हिटी अॅप आहे. ज्यामध्ये जियोफेसिंग, कस्टमाइज्ड साऊंड, बाइक डायग्नोस्टिक, बॅटरी स्टेटस, राइड डेटा यासारखे फिचर्स आहेत.

4) आरव्ही 400 सिंगल चार्जमध्ये जवळजवळ 150 किमीपर्यंत धावते

ऊस राहतोय का काय? या भीतीपोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होतेय लूट

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *