
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार नवीन स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पाहायला मिळत आहेत. पण शिवसेना पक्ष फोडण्यामागे भाजप पक्षाचा हात आहे असं बोललं जात आहे. यामध्येच आता युवासेना सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी एक मोठं विधान केलं आहे.
धुळीमुळे होणाऱ्या अलार्जिपासून बचाव करायचाय? मग करा ‘हे’ घरगुती उपाय
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भविष्यात पंतप्रधान बनतील, अशी भीती भाजपला होती. त्यामुळेच भाजपने शिवसेना फोडली, असा दावा वरूण सरदेसाईंनी केलाय . उस्मानाबादमध्ये युवा सेनेच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वरूण सरदेसाई बोलत होते. उद्धव ठाकरे कट्टर हिंदुत्ववादी असूनही त्यांनी दोन पक्ष सोबत घेऊन राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. दोन पक्षांना सोबत घेऊनहि मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. असे देखील सरदेसाईंनी सांगितले.
जर उद्या उद्धव ठाकरेंबाबत अशीच लोकप्रियता राहिली तर 2024 ला ते पंतप्रधान पदाचे दावेदार बनू शकतील. या भीतीनेच भाजपने शिवसेना (Shiv Sena) फोडली असल्याचं वरूण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
Central Govt: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! तांदळाची निर्यात बंद; सर्वसामान्यांवर काय परिणाम?