Badlapur School Rape Case Update । बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Badlapur News

Badlapur School Rape Case Update । बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली असून, त्यास प्रारंभिक तपासादरम्यान 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज, अक्षय शिंदेला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले असून, कल्याण न्यायालयाने त्यास 9 सप्टेंबरपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Aditya Thackeray । आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजपचा विरोध; कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

या प्रकरणात शाळेच्या अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आले असून, त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत काही कलम वाढवण्यात आली आहेत. पोलिसांनी कोर्टात न्यायालयीन कोठडीसाठी याचिका दाखल केली आहे. (Badlapur School Rape Case Update)

Vasant Chavan Passed Away । ब्रेकिंग! काँग्रेस नेते वसंत चव्हाण यांचे निधन; नांदेडमध्ये शोककळा

याप्रकरणी दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून, त्या समितीने बदलापुरातील अल्पवयीन लैंगिक शोषण प्रकरणाचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या अहवालाचे बारकाईने परीक्षण करण्यासाठी बैठक बोलावली आहे.

Pune crime । पुण्यातुन खळबळजनक बातमी! पोलीस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला

काँग्रेसने शाळेतील संचालक मंडळाच्या बरखास्तीची मागणी केली असून, नवे संचालक नियुक्त करण्यात आले आहेत. काँग्रेसने शाळेच्या संचालक मंडळावर आक्षेप घेतला आहे, विशेषतः भाजपशी संबंधित असलेल्या विश्वनाथ पाटील यांच्यावर. काँग्रेसने मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निष्पक्ष व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

Jayant Patil । राजकारणातून सर्वात मोठी बातमी! जयंत पाटील भाजपत जाणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Spread the love