शरद पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Big shock to Sharad Pawar; 'This' woman leader of NCP joins BJP

सध्या नाशिकमधून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. माजी खासदार वसंतराव पवार (Vasantrao Pawar) यांची मुलगी अमृता पवार (Amruta Pawar) या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला धडाकेबाज निर्णय; वाचा सविस्तर

अमृता पवार (Amruta Pawar) या देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अमृता पवार यांच्या भाजपात प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अमृता यांच्या भाजप प्रवेशाने नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत (Nashik Loksabha) चुरशीचे राजकारण पाहायला मिळणार आहे.

शेतकरी राजा चिंतेत! राज्यात आजपासून अवकाळी पाऊस; ‘या’ ठिकाणी होणार गारपीठ

अमृता पवार (Amruta Pawar) या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नाशिक जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून राहिलेल्या माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांना समोर ठेऊन भाजपने हा खेळ खेळल्याचे बोलले जात आहे.

अन् शेतकऱ्यांनी चक्क टोमॅटो फेकून दिले; कवडीमोल दरामुळे उत्पादक वर्ग चिंतेत!

अमृता पवार या नाशिक जिल्हा परिषद सदस्या आणि गोदावरी अर्बन को. ऑप. बॅंकेच्या विद्यमान अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी त्याचबरोबर खा. सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय असल्याचे देखील बोलले जात आहे.

धक्कादायक! कोपर्डीतील ५ वर्षीय चिमुकल्याचा बोअरवेलमध्ये पडून दुर्दैव मृत्यू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.

Join WhatsApp group for regular update
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker extensions or Software for www.elokhit.com.