केसीआर यांना मोठा धक्का! बडे नेते, माजी मंत्री, खासदार,आमदार आणि २० पेक्षा जास्त महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Congres

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) हे आषाढी वारीचे औचित्य साधून आपल्या संपूर्ण मंडळासह पंढरपूरला येत आहेत. पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार व्हावा यासाठी त्यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. परंतु तेलंगणामध्ये केसीआर (KCR) यांना चांगला धक्का बसला आहे. कारण पक्षाचे अनेक बडे नेते, माजी मंत्री तसेच खासदार, आमदार आणि २० पेक्षा जास्त महत्वाचे पदाधिकारी आज दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात (Congres) प्रवेश करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

शरद पवारांच्या ‘त्या’ टीकेचा घेतला फडणवीसांनी खरपूस समाचार, म्हणाले; ‘त्यावेळी मी..

निवडणुकीपूर्वी केसीआर यांना हा मोठा धक्का समजला जात आहे. केसीआर हे महाराष्ट्र्रात पक्षाचा विस्तार करण्यासाठी येत असले तरी त्यांनी स्वतःच्या राज्याकडे लक्ष दिले नाही. यामध्ये बीआरएसचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव, माजी खासदार पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी, विद्यमान आमदार दामोदर रेड्डी, माजी आमदार गुरुनाथ रेड्डी तसेच तेलंगणातील 5 माजी आमदार, स्थानिक संस्थांच्या पदांवर असणारे 20 इतर महत्त्वाचे नेते यांच्यासह अनेक पदाधिकारी, नेते काँगेसमध्ये प्रवेश करत आहेत.

‘केसीआर यांच्या दौऱ्यामागे राजकीय कारस्थान’, ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

दरम्यान दरम्यान, केसीआर यांच्या दौऱ्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेख पुणेकर यांनी देखील पक्षाची साथ सोडत नुकताच बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.

लग्नानंतर पत्नीला शिक्षण दिले, अधिकारी बनवले; पण पत्नीने पतीसोबत केले असे काही कृत्य की वाचून तुम्हीही हादराल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *