मोठी बातमी! पृथ्वी शॉ सेल्फी वाद प्रकरणी तरुणीला अटक

Big news! Young girl arrested in Prithvi Shaw selfie case

अनेक मोठे मोठे सेलेब्रिटी बऱ्याचदा त्यांच्या चाहत्यांमुळे अडचणीत येतात. भारताचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Pruthvi Shaw) देखील त्याच्या चाहत्यांमुळे अडचणीत आला आहे. सेल्फी देण्यास नकार दिल्याने त्याच्याशी काही चाहत्यांनी हुज्जत घातली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत गेले असून या प्रकरणी एकूण 8 जणांविरुद्ध एफआरआय नोंदवला गेला आहे. तसेच सपना गिल नावाच्या तरुणीला अटक देखील करण्यात आली आहे.

परदेशात राहणारी तीन वर्षीय मुलगी गाते शिवाजी महाराजांचे पोवाडे; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटर पृथ्वी शॉने सेल्फी ( Selfi) घेण्यास नकार दिल्यामुळे त्याचा आपल्या चाहत्यांसोबत वाद झाला. या वादातून टोळक्यांनी पृथ्वी शॉच्या मित्राच्या कारची तोडफोड केली. एवढंच नाही तर पृथ्वी शॉशी हुज्जत घातली. यावेळी त्याला मारण्याचाही प्रयत्न केला गेला.

अदानी झाले आनंदी! वित्तीय आयोगाने दिली क्लीन चिट

याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीच्या हातात बेसबॉलची काठी असून ही काठी पृथ्वी शॉ पकडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सपना गिल या तरुणीला अटक केले आहे.

बॉयफ्रेंड रुसला म्हणुन तिने लिहिले पत्र; म्हणाली, “लव्ह यू माझा कबुतर, जानू, फौजी, टमाटर रसगुल्ला…”

त्याच झालं असं होतं की, वांद्रे पश्चिम येथील व्यावसायिक आशिष यादव हे क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत बुधवारी ( ता.16) दुपारी सांताक्रुझ विमानतळाजवळील सहारा स्टार हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी आरोपी सपना गिल व शोबित ठाकूर यांनी पृथ्वी शॉकडे सेल्फी काढण्याचा आग्रह धरला. पृथ्वीने त्यांच्यासोबत सेल्फी काढला, परंतु ते वारंवार सेल्फी काढण्याची मागणी करू लागले. यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने त्यांना हॉटेलमधून बाहेर काढले. दरम्यान संतप्त सपना व शोबित यांनी आपल्या साथीदारांना गोळा करून हाणामारी केली.

कसबा चिंचवड निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची; आमदार गिरीश बापट आजारी असूनही प्रचारासाठी मैदानात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *