मोठी बातमी! नाशिकच्या गोल्डमॅनला 22 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याखाली अटक

Big news! Nashik's Goldman arrested in 22 crore financial scam

नाशिकमधील गोल्डमॅन पंकज पारख (Goldman Pankaj Parakh) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. येवले येथील प्रसिद्ध उद्योगपती व राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. नाशिक येथील कै.सुभाषचंद्र पारख पतसंस्थेत ते चेअरमन असून या ठिकाणी त्यांनी तब्बल दोन कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. याबाबतची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

महाविकास आघाडीत कोणताच मतभेत नाही, आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच; संजय राऊतांचे वक्तव्य चर्चेत

या पार्श्वभूमीवर पंकज पारख यांना नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. येवला येथील कै.सुभाषचंद्र पारख पतसंस्थेच्या संचालक मंडळावर 21 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बँकेचे प्रशासक आणि सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी तक्रार दिली होती. यामध्ये 17 संचालकांचा समावेश आहे.

चित्रपटांनंतर आता गौतमी पाटील राजकारणात येणार? स्वतःच केला याबाबत खुलासा, म्हणाली…

दरम्यान, पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पंकज पारख हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. यामुळे त्यांना
नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. याशिवाय नंतरच्या तपासासाठी पारख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घेऊन जाणार आहेत. काल दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले होते.

शरद पवार यांनी ‘तो’ एक चुकीचा निर्णय घेतला नसता तर आमची सत्ता गेली नसती, अजित पवार यांचे वक्तव्य चर्चेत

पंकज पारख यांना त्यांच्या सोन्याच्या शर्टाने गिनीच बुक मध्ये स्थान मिळवून दिले होते. त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांनी चार किलो सोन्याच्या वजनाचा शर्ट घातला होता. या शर्टची किंमत आता कोटींच्या घरात आहे. सध्या येवला नगरपरिषदेचे उपाध्यक्षपद देखील त्यांच्याकडेच आहे. तसेच ते सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत.

रोहित पवार यांना आवरला नाही हुरडा खायचा मोह; म्हणाले, “थंडी आणि हुरडा हे एक..”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *