मोठी बातमी! ठाण्यातील अवजड वाहतूक उद्यापासून बंद

Big news! Heavy traffic in Thane will be closed from tomorrow

ठाणे : देशभरात नवरात्र उत्सव (Navratri festival) मोठ्या उत्सहात चालू आहे. उद्या देवीचे विसर्जन होणार आहे याच पार्शवभूमीवर देवी विसर्जन मिरवणूकांमुळे उद्या दुपारी ठाण्यातील अवजड वाहतूक बंद राहणार आहे. पोलीस (Police) आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना ठाणे पोलिसांनी बंदी घातली आहे. उद्या देवीचे विसर्जन होणार आहे त्यामुळे दुपारी २ ते रात्री संपेपर्यंत ही बंदी कायम असणार आहे.

सणासुदीच्या मुहूर्तावर ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फुल शेतीचं पावसामुळं नुकसान

या अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत वाहतूक (Transportation) करण्यास परवानगी आहे. उद्या देवीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये वाहतूक कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहनाची कोंडी होऊ नये यासाठी दुपारी २ ते रात्री देवीच्या मिरवणूका संपेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

नवरात्रीत गरबा खेळताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यूंमध्ये वाढ, आत्तापर्यंत सहा युवकांचा मृत्यू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *