
पुणे: पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे काल ( दि.24) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या कर्करोगासारख्या ( cancer) गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी त्या एक आहेत. पुण्याच्या महापौर म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
हिवाळी अधिवेशनात अजित पवार शांत; आमदार नाराज
पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात मुक्त टिळक यांचा पुढाकार होता. 2002 मध्ये राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या नावावर महापालिकेत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान आहे.
आनंदाची बातमी! विहरीसाठी शेतकऱ्यांना मिळणार लाखोंचे अनुदान
2019 च्या विधानसभा निवडणुकीत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजपने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या आमदार झाल्या. नंतरच्या काळात मात्र त्या आजारी पडल्या. राज्यसभा निवडणुकीच्यावेळी देखील त्यांना मतदानासाठी मुंबईत एअरअॅम्ब्युलन्सने घेऊन जाण्यात आलं होतं.
राज्यामध्ये कोरोना निर्बंधाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले…
मुक्ता टिळक यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झाले होते. त्यानंतर त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. मानसशास्त्र या विषयातून त्यांनी एमए करून पुढे त्यांनी एमबीए देखील केले आहे. मुक्ता टिळक यांच्या मृत्यूच्या बातमीने पुणेकर हेलावून गेले आहेत.
साईबाबांच्या दर्शनाला जाताना आता मास्क वापरणे सक्तीचे: साई संस्थानचं आवाहन