काँग्रेस-राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये करणार प्रवेश; महाडिकांचा दावा

BJP

राज्यात लवकरच लोकसभा निवडणुकांना (Loksabha Election) सुरुवात होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष राज्यात पाहायला मिळत असला तरी अनेक दावे- प्रतिदावे केले जात आहे. भाजप (BJP) खासदार धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे मोठं-मोठे नेतेमंडळी भाजपच्या वाटेवर असून लवकरच त्यांच्या पक्षप्रवेश होणार आहे, असा बॉम्ब महाडिक यांनी टाकला आहे.

“…म्हणून दीपक केसरकर यांनी मला ऑफर दिली असेल” अजित पवार बोललेच

राज्यात येत्या 27 जूनला कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मोठा धमाका होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. माध्यमांशी बोलताना महाडिक यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे कोणते नेते भाजपच्या वाटेवर आहेत? असा प्रश्न आता पडत आहे.

सर्वात मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर यांना अटक करा, हिंदू महासंघाची मोठी मागणी

त्यांना लोकसभा निवडणुकांबाबत विचारले असता ते म्हणाले ‘मी पक्षाचा खासदार असून पक्षाने आदेश दिला तरच मी आगामी निवडणूक लढवणार. त्यांनी प्रचार करायला सांगितला तरीही मी करणार. पक्षाने सांगितल्याप्रमाणे मी काम करणार. तसेच त्यांनी महापालिका निवडणुकांबाबत प्रतिक्रिया दिली. ‘सत्तेत बदल झाल्यानंतर आम्ही शहरातील विविध प्रभागांत वेगवगेळ्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. महापालिका निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होतील आणि या निवडणुकीत आमचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! वर्धापनदिनापूर्वी ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *