मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविदयालय असे नामकरण करण्यात आले आहे. यानंतर संपूर्ण राज्यात आणि बारामती (Baramati) तालुक्यात याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)
म्हसोबाच्या वाडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा योग दिन साजरा
पाचशे विद्यार्थी क्षमता आणि पाचशे खाटांच्या क्षमतेच्या या महाविद्यालयाचे नाव बदलण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून घेण्यात आला आहे. भाजपच्या (BJP) या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलाच धक्का मिळाला आहे. आगामी निवडणुका भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढवणार नसल्याचे संकेत यावरून आपल्याला मिळत आहेत.
ब्रेकिंग! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहिल्या देवींचे नाव या महाविद्यालयाला मिळाले असल्याने याचा आम्हाला आनंद असणार आहे, असे पवार म्हणाले. परंतु भाजपने बारामतीत राष्ट्रवादीला चांगला दिल्याचे बोलले जात आहे.
शेतकऱ्यांना मोठा झटका! गायीच्या दूधदरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पशुखाद्यही महागले