
पुणे : कोरोनाने संपूर्ण दोन वर्षे लोकांना घरी बसवून ठेवले होते. हा काळ लोकांसाठी शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक पातळीवर परीक्षा घेणारा होता. आता कुठे लोक यातून बाहेर पडत आहेत. हळूहळू परिस्थिती पूर्वरत होत आहे. तोपर्यंत महाराष्ट्रात एक नवीन विषाणू दाखल झाला आहे. झिका ( Zika) असे नवीन विषाणूचे नाव असून पुणे येथे याचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
धक्कादायक! दोन सख्ख्या चिमुरड्या भावंडांचा तळ्यात बुडून मृत्यू
पुणे जिल्ह्यातील ( Pune ) बावधन येथे झिका चा रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण मूळचा नाशिक मधील असून काही दिवसांपूर्वी तो सुरतला देखील गेला होता. सुरतवरून परतल्यानंतर या रुग्णाला ताप, खोकला, सांधेदुखी व थकवा ही लक्षणे दिसू लागली. त्यामुळे या रुग्णाने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. यावेळी केलेल्या टेस्टमध्ये तो ‘झिका’ बाधित असल्याचे समोर आले. इतकंच नाही तर, पुण्यातील एनआयव्हीने देखील त्याचे नमुने तपासून तो झिका बाधित असल्याचे जाहीर केले आहे.
येणार …येणार! कापसाला पण ‘अच्छे दिन येणार’; अगामी काळात दर वाढण्याची शक्यता
यामुळे पुण्यातील महानगरपालिका यंत्रणा सतर्क झाली असून झिका बाधित रुग्णाच्या घराचे व त्याच्या आजूबाजूच्या परिसराचे परीक्षण करण्यात आले आहे. सध्या तिथे कोणताच इतर रुग्ण आढळला नाही. परंतु, प्रशासनाने काळजी घेण्यास सांगितले आहे. ताप, पुरळ,उलट्या, सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोकेदुखी अशी लक्षणे असल्यास रुग्णांनी सतर्क राहून उपचार घ्यावेत अशा सूचना पुणे महानगर पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.
आनंदाची बातमी! शेतकऱ्यांनी केवळ चालू वीजबिल भरावी अशी सरकारकडून सूचना