Maharashtra Rain Alert : सावधान! पुढील 24 तास धोक्याचे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : पाऊस जरी केरळ आणि तळकोकणात आला असला तरी तो महाराष्ट्रातून जणू काही गायबच झाला आहे. यंदा एल निनो आणि चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस रखडला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. कारण पुढील 24 तासांत हवामान खात्याकडून मराठवाडा, मुंबई, कोकण, मध्य व उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडणार आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बिपरजॉय वादळाच्या तडाख्यानंतर महाराष्ट्र्राला यावर्षी पावसाची वाट पाहावी लागत आहे. असे असतानाच महाराष्ट्र्रातील काही शहरात पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान,आज मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग,अहमदनगर तसेच औरंगाबाद, सातारा, नाशिक,जालना, परभणी आणि नजिकच्या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.

एकीकडे चक्रीवादळाचे थैमान तर दुसरीकडे पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. परंतु गुरुवारी भारतीय हवामान विभागाने देशात आणि राज्यात 23 जूनपासून मान्सून सक्रिय होऊ शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच सध्या वातावरणही ढगाळ आहे त्यामुळे उकाड्याने हैराण असणाऱ्या नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *