Baramati Politics | सर्वात मोठी बातमी! बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

Ajit Pawar

Baramati Politics | निवडणूक आयोग आता कधीही लोकसभा निवडणूक (Loksabha election) जाहीर करू शकते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. बारामतीत यंदाची निवडणूक अटीतटीची असू शकते. बारामतीत यंदा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे (Sunetra Pawar Vs Supriya Sule) असा सामना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Mumbai Crime । धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

शिवसेना पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे . मागच्या काही वर्षांपूर्वी विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर आता विजय शिवतारे यांनी बारामतीत निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली आहे.

Ads

Politics News । महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार? काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

याबाबत बोलताना विजय शिवतारे म्हणाले, “5 लाख 80 हजार मतदार पवार कुटुंबियांच्या विरोधात आहे. त्याला पर्याय म्हणून मी निवडणूक लढणार आहे. अजित पवार यांच्या प्रवृत्तीविरोधात आणि सुप्रिया सुळे यांनी काहीच काम न केल्यानं मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काम करणार असल्याचे विजय शिवतारे म्हणाले आहेत.

Eknath Khadse । “तेव्हा मी भाजपात जाईल…” एकनाथ खडसे यांचे सर्वात मोठे वक्तव्य

Spread the love