सुडाची भावना माणसाला कधी कोणता निर्णय घेण्यास भाग पाडेल हे काही सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. रागाच्या भरात पत्नीने मध्यरात्री पतीच्या प्रायव्हेट पार्टवर गरम तेल ओतले आहे. या घटनेत पती जखमी झाला अजून त्याच्यावर रुग्णालय उपचार सुरू आहेत. तर पत्नी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
Kangana Ranaut। कंगना रणौतने केला मोठा खुलासा; म्हणाली, “लग्न करायची इच्छा आहे पण…”
ग्वालियर येथील भगेह गावातील ही धक्का देणारी घटना घडली आहे. सुनील धाकड असे या पीडित पतीचे नाव असून तो एका खाजगी कंपनीत काम करतो. शेजारी राहत असणाऱ्या एका महिलेने सुनील यांना सांगितले की, “तू घरी नसताना तुझी पत्नी तिच्या नवऱ्यासोबत मोबाईलवर बोलत असते.” यावरून सुनीलने त्याच्या पत्नीला समजावले. परंतु तिच्यात काही बदल झाला नसल्याने त्याने तिचा मोबाईल हिसकावून घेतला.
याचाच राग मनात ठेवून तिने सुनील गाढ झोपेत असताना मध्यरात्री गरम तेल त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ओतून तिथून पसार झाली. त्यानंतर त्याने आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी त्याला दवाखान्यात नेले.