
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. उर्फीची खरी ओळख फॅशन सेन्समुळे वाढली आहे. उर्फी कधी तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे तर कधी कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकत असते. उर्फीने तिच्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. उर्फी ‘बिग बॉस’मधून प्रसिद्धीच्या झोतात आली.
गौतमी पाटीलचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले, “तू तर खूपच…”
उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अनेकदा उर्फीचे व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण होतात. तर कधी तिच्या फॅशनचे कौतुक केले जाते. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये उर्फीच्या कपड्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यादरम्यान उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजपाला राजकारणासाठी औरंगजेब हवा आहे, संजय राऊत यांची जोरदार टीका
नुकताच उर्फीने एक नवीन लुक केला आहे. जो पाहून चाहतेच काय तर पापाराझी देखील भीतीने पाळायला लागले. उर्फी ही अत्यंत अंतरंगी कपड्यांमध्ये दिसत आहे. सर्वात विशेषबाब म्हणजे या ड्रेसमध्ये उर्फीचे अंग काय तर तिचे केस देखील दिसत नाहीये. या नव्या लुकमध्ये उर्फीचा चेहरा देखील दिसत नाही. फक्त डोळे दिसत आहेत.
उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका युजरने म्हटले की, अरे हा काय चमत्कार झाला आहे. दुसऱ्याने लिहिले की, कोई मिल गयाच्या जादूमधून आलीये. तर तिसऱ्याने म्हटले की, एलियन दिसत आहे. अशा खूप सार्या कमेंट उर्फीच्या या व्हिडिओवर येत आहे.
नाद करा पण आमचा कुठं! शेतकरी कुटुंबातील मुलाने लग्नाला वऱ्हाड थेट बैलगाडीनं नेलं…