Bacchu Kadu । बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तिव्र; प्रकृती चिंताजनक, राज्यभरात राजकीय हालचालींना वेग

Bacchu Kadu

Bacchu Kadu । प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला यांच्यासाठी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून, त्यांच्या प्रकृतीची स्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. डॉक्टरांच्या अहवालानुसार त्यांच्या वजनात तब्बल चार किलो घट झाली असून, रक्तदाबातही वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. तरीदेखील बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Rain Update : मुंबईकरांनो, सावध! पुढील ३ तास अत्यंत महत्त्वाचे – हवामान विभागाचा रेड अलर्ट

बच्चू कडूंनी हे आंदोलन केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक न्यायासाठी असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. “शेतकऱ्यांचं दु:ख जातधर्म पाहत नाही, ते फक्त अन्याय ओळखतं. आम्ही मरण पत्करू पण मागे हटणार नाही,” असं ते म्हणाले.

राज्यभरातून या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असून, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते बच्चू कडू यांच्या पाठिशी उभे राहत आहेत. विशेषतः शरद पवारांनी बच्चू कडूंशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. याशिवाय मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे देखील आज त्यांच्या भेटीला जाणार आहेत.

Pune News । पुण्यातील बोपदेव घाटात धक्कादायक प्रकार; पोलिसांनीच केलं गैरकृत्य

बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय केवळ मंदिरात पुण्य कमवून सुटत नाही, असं खवळून त्यांनी सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट) या पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्तेही आंदोलनस्थळी दाखल होत असल्याने, या आंदोलनाच्या राजकीय परिणामांचा वेध घेतला जात आहे.

बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला असून, सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. आता सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Spread the love