शिंदे गटाच्या अंधेरी विभाग प्रमुखावर हल्ल्याचा प्रयत्न,अज्ञात मारेकऱ्यांनी चेहऱ्याला कापड बांधले आणि..

Attempted attack on Andheri division head of Shinde group, unknown killers tied a cloth on his face and..

राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकी आणि हल्ल्यांच्या (Attacks) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर देखील शिवाजी पार्क परिसरात हल्ला झाला होता. तसेच आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला होता, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. (Latest Marathi News)

Sarfaraz Khan Marriage । सामना पाहायला आलेल्या तरुणीच्या प्रेमात पडला IPL चा स्टार खेळाडू, गुपचुपच केलं लग्न

अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभागाचे प्रमुख अल्ताफ पेवेकर (Altaf Pevekar) यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. पेवेकर वर्सोवाच्या (Versova) दिशेने घरी जात असताना अज्ञातांनी बॅटने त्यांच्या गाडीची काच फोडली. (Attack on Altaf Pevekar) हल्ल्यात त्यांना थोडी दुखापत झाली. या हल्ल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

Havaman Andaj । विदर्भातील शेतकरी संकटात! ‘या’ पाच जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा

मुंबई महापालिका निवडणुकांची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे सर्व पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेनेमध्ये फूट पडल्याने शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. यंदाची निवडणूक खूप अटीतटीची होणार आहे, हे जवळपास निश्चितच आहे. पेवेकर यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Urfi Javed New Look । उर्फी जावेदचा नवीन लुक पाहून डोकं खाजवाल; यावेळी अभिनेत्रीने चक्क खिळ्यापासून…

त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट सतत आमनेसामने आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अशातच आता पेवेकर यांच्या आरोपांना ठाकरे गट कशाप्रकारे प्रत्युत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Mukesh Ambani । मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने एका वर्षात २ लाख ६० हजार लोकांना दिला रोजगार

Spread the love