Sangli News । सांगलीच्या राजकारणातून धक्कादायक बातमी! माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक

Sangli News । सांगली : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत काही मतदारसंघ खूप चर्चेत आले आहेत. यातील एक मतदारसंघ म्हणजे सांगली मतदारसंघ होय. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. अशातच सांगलीच्या राजकारणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Loksabha election)

Sharad Pawar । अमित शहांबद्दल शरद पवारांचं धक्कादायक वक्तव्य म्हणाले, “त्यांना…”

नुकतेच भाजपला रामराम ठोकलेले माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांच्या कारवर हल्ला झाल्याची माहिती आहे. ते काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करत होते. या दौऱ्यादरम्यान काल सांयकाळी जिरग्याळ-मीरवाड रस्त्यावर हा प्रकार घडला असून यावेळी तीन अज्ञातांकडून दगडफेक झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Crime News । गोंदिया हादरलं! आदिवासी मुलीवर बलात्कार करून हत्या, पाच दिवसानंतरही पोलिसांच्या हाती…

या प्रकरणी विलासराव जगताप यांनी तातडीने जत पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ नये यासाठी हल्ला करून दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विलासराव जगताप यांनी केला आहे. विशेष म्हणजे हल्लेखोर भाजपाचे खासदार आणि उमेदवार संजयकाका पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar Manifesto । ब्रेकिंग! लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने प्रसिद्ध केला जाहीरनामा, महिलांबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा

Spread the love