Atal Setu Accident Video । देशाच्या आर्थिक राजधानीत नव्याने बांधण्यात आलेल्या अटल पुलावर रविवारी भीषण अपघात झाला. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) म्हणून ओळखल्या जाणार्या या हायवेवर 15 दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर हा पहिलाच गंभीर अपघात आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, कार दुभाजकाला धडकून पलटी झाली.
मुंबईत बांधलेला हा नवीनतम सी-रूट दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडतो. या पुलाच्या बांधकामामुळे आता तासांचा प्रवास मिनिटांत करणे शक्य झाले आहे. NDTV च्या रिपोर्टनुसार, ही घटना दुपारी 3 च्या सुमारास घडली. हॅचबॅकच्या मागे असलेल्या कारच्या डॅशकॅम फुटेजमध्ये वाहन लेन ओलांडताना आणि रेलिंगला धडकताना दाखवले आहे.
Jairam Ramesh । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या गाडीवर जमावाचा हल्ला
माहितीनुसार, ही कार चिर्ले (रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील गाव) येथे जात होती. यात प्रवास करणाऱ्या दोन महिला आणि लहान मुलांसह सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कारच्या अतिवेगामुळे हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.
Amruta Fadnavis । ब्रेकिंग! अमृता फडणवीस यांनी केली मोठी घोषणा