दिल्लीश्वर येऊन दुकान उघडणार आहेत का? संजय राऊत यांची खोचक टीका, राऊत नेमकं काय म्हणाले?

'Sanjay Raut is like a kid playing loose in a band', BJP leader slams Raut
pc – facebook

राज्यभरात शिवजयंती (Shiva Jayanti)मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. शिवाजी महाराज Shivaji Maharaj) यांचे जन्म ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर (Shivneri) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध शासकीय कार्यक्रमचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यावेळी शिवभक्तांना दर्शन घेण्यापासून रोखले गेले.

मोठी बातमी! शिवसेनेच्या ट्विटर हँडलचं ब्ल्यू टिक गेलं, वेबसाईट देखील बंद

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जनसामान्यांचे राजे आहेत. पण या नव्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांना तोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि प्रेरणास्थानावर मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न दिल्लीतून होतोय का अशी शंका यायला लागली आहे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले आहे.

कार्तिक आर्यनची क्रेझ अखेर झाली कमी ? दुसर्‍याच दिवशी ‘शहजादा’

तसेच, शिवनेरीवर सामान्यांना प्रवेश नसेल तर तिथं काय दिल्लीश्वर येऊन दुकान उघडणार आहेत का? तिथेही महाराष्ट्राचा व्यापार करणार आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. यादरम्यान, संभाजी राजे यांनी हातात माईक घेऊन सरकारला सुनावले आहे. गडावर येऊन दर्शन घेऊ दिल जात नाही हे चालणार नाही. त्यामुळे तुम्हीला शासकीय कार्यक्रम करायचे असेल तर करा पण दुजाभाव नको, अशी मागणी संभाजी राजे यांनी केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *