
Anju Verma । प्रेमासाठी (Love) कोणीही कोणत्याही थराला जाऊ शकतो. अनेकजण प्रेमविवाह (Love marriage) करतात. महत्त्वाचे म्हणजे प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध असतो. तरीही ती जोडपी आपल्या निर्णयावर ठाम राहतात. अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा (Social media) वापर जास्त होऊ लागला आहे. विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर अनेकजण प्रेमातही पडतात. प्रेमासाठी ते देशाच्या सीमाही पार करतात. (Latets Marathi News)
भारताची बॉर्डर पार करून अंजू वर्माने पाकिस्तानात (Pakistan) राहत असणाऱ्या फेसबुक फ्रेंडशी (Facebook friend) लग्न केले. त्यानंतर तिचे नाव फातिमा असे ठेवले. परंतु आता अंजु भारतात (India) परत येणार आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे. अंजु मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून तिला तिच्या दोन मुलांची आठवण येत आहे, असा दावा तिचा पाकिस्तानातील पती नसरुल्लाहने केलेला आहे.
जरी अंजु भारतात येणार असली तरी तिचे भारतातील कुटुंबीय तिचा स्वीकार करणार का? असा सवाल निर्माण होत आहे. कारण काहीच दिवसांपूर्वी तू आमच्यासाठी कधीच मेली आहेस असे म्हणत तिच्या पतीने तिच्यासोबतचे सगळे संबंध तोडले होते. त्यामुळे भारतात परत येऊ इच्छित असणाऱ्या अंजूसमोर आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तिचे कुटुंबीय तिचा स्वीकार करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.