पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील माळीबाभुळगाव परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती धम्मपाल सांगडे (वय 26) याला ताब्यात घेतले आहे. कांचन धम्मपाल सांगडे (वय 26), निखील धम्मपाल सांगडे (वय 6), संचिता धम्मपाल सांगडे (वय 4) आणि निषीधा धम्मपाल सांगडे (वय दीड) अशी मृतांची नावे आहे. (Ahmadnagar Crime News)
ब्रेकिंग! महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक गोळक यांचा माळीबाभुळगाव परिसरात पोल्ट्री फार्म आहे. तेथे धम्मपाल हा पत्नीसोबत मजुरी करत होता. बुधवारी रात्री त्यांच्यात वाद झाला होता. परंतु, मध्यस्थी करून तो मिटवला होता. गुरुवारी सकाळी एक जण विहिरीवर मोटार सुरू करायला गेला असता तेव्हा त्याला निषीधाचा मृतदेह पानावर तरंगताना दिसला. याची पोल्ट्री फार्म चालकाला माहिती मिळत मिळताच त्याने पोलिसांना माहिती दिली. (Latest Marathi News)
महिलेसोबत लॉजवर गेले आप आमदार; मागून आला तिचा नवरा अन्… घडलं भलतंच; पाहा व्हायरल सीसीटीव्ही फुटेज
तीन ते चार तास विहिरीचे पाणी उपसल्यानंतर कांचन आणि तिची तीनही मुलांचे मृतदेह सापडले. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. पोलिसांनी धम्मपालला अटक केली आहे.
कार्तिक आर्यनने भर कार्यक्रमात कियारासोबत केलं ‘हे’ कृत्य, व्हिडीओ झाला व्हायरल; नेटकरी म्हणाले…