
Amruta Fadanvis । नवीन वर्षाला आजपासून सुरुवात झाली असून राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत केले जात आहे. अनेकांमध्ये नवीन वर्षाचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जगातील दिग्गज नेते आणि कलाकार यांच्याकडून नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. दरम्यान प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांनी देखील त्यांच्या चाहत्यांना हटके अंदाजात नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता फडणवीस या बँकर असून त्या उत्तम गायिका देखील आहेत. त्यांच्या गाण्याची सोशल मीडियावर कायम चर्चा सुरू असते. सध्या देखील अमृता फडणवीस यांनी प्रसिद्ध व्हायरल डायलॉग म्हणत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता फडणवीस यांचा व्हायरल झालेला डायलॉग “सो ब्युटीफुल सो इलिगंट” म्हणत नवीन वर्षाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांची लेक दिविजादेखील दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ चर्चेत असून नेटकरी देखील या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर अमृता फडणवीस यांना देखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
A beautiful & elegant start to a beautiful & elegant #NewYear2024 #HappyNewYear2024 pic.twitter.com/AABl7eQgm0
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 31, 2023