अमृता फडणवीस धमकी प्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती! शरद पवारांसह ‘या’ बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Amrita Fadnavis threat case shocking information has come to light! The names of 'these' big leaders including Sharad Pawar are in discussion

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) सध्या खूप चर्चेत आहेत. मागच्या काही दिवसांपासून खूप साऱ्या सेलिब्रिटीजला धमक्यांचे कॉल्स येत होते. तर काहीजणांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली जात होती. दरम्यान अमृता फडणवीस यांच्याकडे खंडणीची मागणी करणारा अनिल जयसिंगानी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांना अटक केली होती. परंतु पुन्हा एकदा त्या प्रकरणाने डोकं वर काढलं आहे.

कोण आहे अभिषेक पर्वते? एका अपघाताने जीवनच पालटले; आता ‘या’ व्यवसायांचा आहे मालक!

अनिल जयसिंघानी व अनिक्षा जयसिंघानी यांनी खंडणीसाठी तयार केलेली sound film देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddav Thakre) यांना, ही sound Film पाठवण्याची धमकी दिली होती.

संतापजनक घटना! बसमध्ये व्यक्तीने महिलेला केलं नको त्या जागी स्पर्श, अन् नंतर महिलेने केलं असं की… व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

मलबार हिल पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात मे महिन्यात न्यायालयामध्ये 733 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये 13 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती. या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. अमृता फडणवीस यांनी अनिक्षाच्या धमक्यांमुळे तिचा नंबर ब्लॉक केला होता. त्यामुळे 21 फेब्रुवारीला अनिक्षाने पाठवलेल्या संदेशांमध्ये ती असं म्हणाली आहे की, ‘माझा नंबर ब्लॉक केल्यामुळे माझे वडील रागावले आहेत आणि ते तुमच्या कुटुंबाला हानी पोहोचू शकतील’ असं म्हणत अनिक्षाने थेट धमकीच दिली आहे.

iPhone 11 खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ ठिकाणाहून फक्त पंधरा हजार रुपयांमध्ये खरेदी करा मोबाईल

अमृता फडणवीस यांनी २० फेब्रुवारी रोजी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी ‘अनिक्षा व तिचे वडील अनिल जयसिंघानिया यांनी मला लाच देऊन अडकवण्याचा प्रयत्न केला’ अशी तक्रार दाखल केली होती. अनिक्षाने तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी 1 कोटी रुपये देण्याची तयारी देखील दाखवली होती. अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी तो कॉल बंद केला आणि तिचा नंबर ब्लॉक करून टाकला होता.

भर लग्नमंडपात आधीची पत्नी आली अन् घातला गोंधळ; पुढं घडलं असं काही वाचून तुम्हालाही बसेल धक्का

अनिक्षाने 22 Film tape, 3 voice notes, व WhatsApp वर एका अनोळखी नंबर वरून त्यांना मेसेज करत होती. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारे दहाच्यानंतर त्याच नंबर वरून 40 मेसेजेस, व्हॉइस नोट्स व स्क्रीनशॉट अमृता फडणवीस यांना पाठवले होते. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.

दिल्लीत गँगवार! चार जणांवर गोळीबार, जखमी तरुणांची आई म्हणाली, “माझ्या…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *