Ajit Pawar । राजकारणात येणार मोठा भूकंप? अजितदादांचा बड्या नेत्यासोबत एकाच गाडीने प्रवास, पडद्यामागं नेमकं काय घडतंय?

Ajit Pawar

Ajit Pawar । पुणे : मागील वर्षी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) मोठी फूट पाडली आणि भाजप, शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाले. शिवाय पक्ष आणि चिन्ह देखील अजित पवार गटाला मिळाले. अजितदादा सत्तेत सहभागी झाल्यापासून विरोधक ते पुन्हा मोठा भूकंप करणार असल्याचा दावा करत आहेत. अशातच आता राजकारणात मोठा भूकंप येण्याचे संकेत मिळत आहेत. (Latest marathi news)

Maharashtra Politics । ठाकरे गटाला मोठं खिंडार! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

अजित पवार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhal Rao Patil) यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे देखील होते. या नेत्यांनी विविध विकासकामांचं उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्यासाठी हजेरी लावली. यानंतर तीनही नेत्यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.

Yogi Adityanath । खळबळजनक! योगी आदित्यनाथ यांना दिली बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस कंट्रोल रूममध्ये आला फोन आणि…

आता या भेटीवर अजित पवार काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिरुर लोकसभेच्या जागेतून शिवाजी आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ जागावाटपात अजित पवार गटाला मिळाला तर शिवाजी आढळराव पाटील निवडणूक लढायला तयार आहेत, अशा चर्चांना उधाण आले आहे. शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Crime News । धक्कादायक! सलमान खानवर चाकूने हल्ला, पोलिसांकडून चौघांना अटक

Spread the love