Ajit Pawar । सर्वात मोठी बातमी! अजित पवार नाराज? मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर; नेमकं काय घडतंय?

Ajit Pawar

Ajit Pawar । राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे, या बैठकीला अनेक बडे नेते उपस्थित होते मात्र यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Shednet house planting । शेडनेटगृह लागवडीचे फायदे काय? यामध्ये कोणती पिके घेता येतात? वाचा डिटेल माहिती

मागच्या काही दिवसांपूर्वी गणेशउत्सव काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी अनेक बड्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी येऊन बाप्पाचे दर्शन घेतलं. यामध्ये प्रसिद्ध उद्योगपतींपासून बॉलीवूडचे अनेक मोठमोठे स्टार आणि बडे राजकीय नेते देखील उपस्थित होते. मात्र यावेळी देखील अजित पवार हे वर्षा बंगल्यावर गेले नाहीत त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा चालू होत्या. यामध्येच आता ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित नसल्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Dhananjay Munde । सर्वात मोठी बातमी! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीक विम्याचा अग्रीम

अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर का?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार हे सध्या त्यांच्या देवगिरी निवासस्थानी आहेत. ते आजारी असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र ते गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

Maharstra Rain । मोठी बातमी! सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मोठं मोठी झाडे कोसळली

Spread the love