
Ajit Pawar । राजकीय वर्तुळात कधी काय होईल ते सांगता येत नाही. सत्तेत बसलेले विरोधात जातात तर कधी विरोधात बसलेले सत्तेत सहभागी होतात. मागील वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shivsena) फोडत भाजपसोबत (BJP) युती केली तर २ जुलै रोजी अजित पवार यांनी आपल्या ८ सहकारी नेत्यांसोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. महाविकास आघाडीमध्ये असणारे दोन्ही पक्ष फुटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)
अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून सतत चर्चेत येत आहेत. लवकरच ते मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहेत. नुकतेच अजित पवार एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत जाऊन बसल्याने पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आले आहे.
Nitin Desai । नितीन देसाईंचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर
मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसायला सांगितले. तसेच नार्वेकर यांनी खुर्चीवर बसण्यापूर्वी त्यावरील स्टिकर काढून टाकला.शिंदेच्या गैरहजेरीत अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Rain in Maharashtra । राज्यात आज पुन्हा मुसळधार पाऊस! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट