NCP MLA Disqualification । शरद पवारांच्या अडचणी वाढल्या? अजित पवार गटाच्या वकिलांनी जयंत पाटलांना पकडले कोंडीत

NCP MLA Disqualification । मागील वर्षी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वात मोठी फूट पाडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पक्षात फूट पडूनही आजही अनेक पदाधिकारी अजित पवार गटात सहभागी होत आहेत. खरी राष्ट्रवादी कोणाची? यावर अजून निर्णय झाला नाही. सध्या याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. (Latest marathi news)

Private Jets | “बॉस सेक्स करत होता…”, एअर होस्टेसने प्रायव्हेट जेटबाबत केला अत्यंत धक्कादायक खुलासा

आज राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडत असून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज महत्त्वाची साक्ष नोंदवण्यात येत आहे. सुनावणीदरम्यान, अजित पवार गटाच्या वकिलांनी जयंत पाटलांना कोंडीत पकडण्याचा चांगलाच प्रयत्न केला. (NCP MLA Disqualification Case)

Maratha Protest HC । सर्वात मोठी बातमी! न्यायालयाने स्वीकारली मराठा आंदोलनाविरोधातील याचिका

अजित पवार गटाच्या वकिलांनी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड 3 वर्षांसाठी करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ 2022 सालीच संपला, असा असा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत ते निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असा गंभीर आरोप केला. यावेळी जयंत पाटील यांनी आपली 3 वर्षांसाठी निवड केली असून कार्यकाळ संपत नाही. पुढील निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरु राहतो. मी या पदावर निवडून आलो आहे, असे स्पष्टीकरण दिले. माझी प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचे पत्र प्रफुल्ल पटेल यांनी पाठवले आहे, असा देखील जयंत पाटील यांनी खुलासा केला.

Lok Sabha Election 2024 । इंडिया आघाडीला सर्वात मोठा झटका! ममता बॅनर्जी स्वबळावर लढवणार निवडणूक

Spread the love