Ajinkya Rahane । क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी! टीम इंडियाच्या बड्या खेळाडूने संघाला ठोकला रामराम

Ajinkya Rahane. Bad news for cricket lovers! The big player of Team India beat the team

Ajinkya Rahane । टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सीरिजसोबतच आगामी एकदिवसीय वर्ल्ड कपची तयारी सुरू केली आहे. यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून इशान किशनच्या नावाची चर्चा सुरु आहे. कारण केएल राहुल अजूनही पूर्णपणे बरा झाला नाही. अशातच आता क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी आहे. कारण टीम इंडियाच्या एका बड्या खेळाडूने संघाला रामराम ठोकला आहे.

Rohit Pawar | रोहित पवारांना न्यायालयाकडून मोठा दिलासा! बारामती ॲग्रोवरील कारवाईला तात्पुरती स्थिगिती

टीम इंडियाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे याने यावर्षी इंग्लिश कौंटी लीसेस्टरसोबत एक करार केला होता, त्याचे कसोटी संघात पुनरागमन झाले होते. त्यामुळे तो कौंटीमध्ये सहभागी होऊ शकला नाही. आता त्याने एकदिवसीय चषकातून आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली आहे.

Agri Machinary । कामाची बातमी! पिकातील तणांच्या नायनाटासाठी ‘हे’ यंत्र ठरेल फायदेशीर, जाणून घ्या किंमत

मागील वर्षी फेब्रुवारीपासून रहाणे कसोटी संघाबाहेर होता. परंतु त्याने जोरदार कमबॅक करत देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्येही चांगल्याच धावा केल्या. आयपीएल-2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता.

Eye Flu । सावधान! राज्यात झपाट्याने पसरतेय डोळ्यांची साथ, अशी घ्या काळजी

Spread the love