
Aditya Thackeray । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी सुरज चव्हाण यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आरोपी सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांच्या अगदी जवळचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अडचणीत येणार का? अशा देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
Navneet Rana । ब्रेकींग! भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय
Shocking News । धक्कादायक बातमी! पक्षाने तिकीट नाकारल्याने खासदाराचा आत्महत्येचा प्रयत्न
ईडीने कथित खिचडी घोटाळा प्रकरणातील आरोपी सुरज चव्हाण यांची मालमत्ता जप्त केली आहे. खिचडी घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे गटातील अमोल कीर्तीकर त्याचबरोबर संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची देखील ईडी करून चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटातील बड्या नेत्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
कोविड काळामध्ये BMC खिचडी वाटप घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला होता. मुंबई या ठिकाणी निवासी फ्लॅट आणि जिल्हा रत्नागिरी येथील शेत जमीन अशी 88.51 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.