Aditya Thackeray । सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ, दिशा सालियान मृत्यू प्रकरणात होणार एसआयटी चौकशी

Adity Thackeray

Aditya Thackeray । सध्या एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सरकारकडून आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. (Disha Salian death cases)

Climate Change Impact । चेन्नई फक्त ट्रेलर आहे, भारतातील ही शहरे शतकाच्या अखेरीस 3 फुटांपर्यंत बुडतील! हवामान बदलाचा धक्कादायक अहवाल

दिशा सालियान अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची मॅनेजर होती. दिशा हिचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिशाने आत्महत्या केली होती. मात्र तिची हत्या झाली असा संशय व्यक्त करत आरोप करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच पाच-सहा दिवसात सुशांत सिंह राजपूत याचा देखील मृत्यू झाला. यामुळे दिशाच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली.

Viral News । 1 पती, 2 बायका आणि 11 मुले, 20 वर्षे लपवून ठेवले हे रहस्य; घटना वाचून पायाखालची जमीन सरकेल

आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा अशी मागणी देखील नितेश राणे यांनी केली. त्यानंतर नागपूरच्या मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आता राज्य सरकार दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची चौकशी करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

Maratha Reservation । ‘महाराष्ट्रात एकही मराठा उरणार नाही कारण…’, कुणबी प्रमाणपत्राचा संदर्भ देत छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य

Spread the love