Accident l मुंबईत गणेशोत्सवाच्या निमित्ताने धक्कादायक हिट अँड रन घटना; दोघांना BMW कारने चिरडलं

Accident News

Accident l राज्यातील हिट अँड रन घटनांमध्ये वाढ होत असून, आज मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर घटना घडली आहे. मुलुंडमध्ये आज पहाटे चार वाजता, एका भरधाव बीएमडबल्यू कारने रस्त्यावर गणेशोत्सवाच्या बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना चिरडले. या अपघातात एक कार्यकर्ता मृत्यू पावला असून, दुसरा गंभीरपणे जखमी झाला आहे.

Ganpati Bappa Morya । गणेश चतुर्थीच्या उत्सवात गणरायाचे घराघरांत दणक्यात स्वागत!

घटनेची माहिती मिळाल्यावर मुलुंड पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. जखमी कार्यकर्त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Ajit Pawar । अजित पवार गटाला किती जागा हव्यात? छगन भुजबळांनी थेट आकडाच सांगितला

या घटनेमुळे मुलुंडमध्ये गणेशोत्सवाच्या वातावरणाला गालबोट लागले असून, शोककळा पसरली आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना या घटनेने मोठा धक्का बसला असून, अपघातामुळे गणेशोत्सवाचा उल्लास कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Devendr Fadanvis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, “अजितदादांसोबतची युती नॅचरल नाही”

Spread the love