Accident । समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! देवेंद्र फडणवीस, शरद पवारांसह पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; मदतीची केली घोषणा

Samruddhi Mahamarg Accident

Accident । छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 20 ते 22 जण जखमी झाले आहेत. (Accident On Samriddhi Highway ) या अपघातानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

Beed News । धक्कादायक बातमी! मनोज जरांगेच्या सभेसाठी आलेल्या 36 वर्षीय मराठा बांधवाचा मृत्यू, नेमकं काय झालं?

नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर पीएम केअर फंडमधूनही मदत जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या अपघाताबाबत ट्विट केलं आहे. (Samruddhi Mahamarg Accident)

पाहा पंतप्रधान कार्यालयाचं ट्विट

“छत्रपती संभाजीनगर जिल्ह्य़ात अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्यासोबत माझे विचार आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना देखील मदत देण्यात येईल” असे ट्विट करण्यात आले आहे.

Ranbir Kapoor । आलिया भट्ट बद्दल रणबीर कपूरने केला मोठा खुलासा; म्हणाला, “ती दररोज…”

पाहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट

“छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 20 जखमींपैकी 14 जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. 6 जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Israel-Gaza war । मोठी बातमी! इस्लामिक देशांच्या गटाने इस्रायल-गाझा युद्धासंदर्भात बोलावली तातडीची बैठक

शरद पवार यांनीही दिली प्रतिक्रिया

समृद्धी महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ झालेला भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हिच प्रार्थना!

समृद्धी महामार्गावर आजवर एकूण ७२९ अपघात झाले आहेत. यात २६२ गंभीर स्वरूपाचे अपघात झालेत. तर ४७ अपघातांच्या घटनेत आजवर १०१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यातून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, या महामार्गावरील सुरक्षेला प्राधान्य देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने शासनाने योग्य ती पाऊले उचलली पाहिजेत.

Accident On Samriddhi Highway । समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! १२ जण जागीच ठार तर २२ जण जखमी

Spread the love