काल खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या अंगावर भरधाव डम्पर आला यावेळी त्यांनी प्रसंगावधान राखत उडी मारली, त्यामुळे ते या घटनेतून सुखरूप बचावले आहेत. पोलिसांनी आरोपीला पकडलं असून, पुढील तपास सुरू आहे. ही घटना चुकीने घडली की या मागे काही घातपाताचा प्रकार आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
शरद पवारांच्या निर्णयावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; ट्विट करून सांगितली मोठी गोष्ट
अपघात की घातपात?
वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी चालू आहे. यावेळी चौकशीमध्ये आपण मोबाइल खेळत असल्याचे वाहन चालकाने सांगितले आहे. वाहन चालकाचे वाहनाकडे लक्ष नव्हते मात्र ओमराजे निंबाळकर हे अलर्ट होते. त्यामुळे डम्पर अंगावर येताच त्यांनी बाजूला उडी मारली. यात ते बचावले. यापूर्वी देखील त्यांच्यावर एकदा चाकूहल्ला झाला होता. त्यामुळे ही घटना अपघात की, घातपात अशा चर्चा चालू आहेत.
“देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही…“, पाकिस्तानच्या ‘या’ बड्या प्लेयरची राहुल द्रविडवर टीका
दरम्यान, या अपघातानंतर मी सुखरूप असल्याची प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. याप्रकरणी चालकाविरोधात कलम 279, 336, 184 अन्वये ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
‘Sharad Pawar | या’ कारणामुळे अजित पवार यांना पद दिलं नाही, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं