Accident News । ब्रेकिंग! तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, १० जण जखमी

Tejasvi Yadav

Accident News । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चालक मोहम्मद हलीम याचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर ६ पोलिसांसह अन्य चार जण जखमी झाले आहेत. सर्व 10 जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

Prakash Ambedkar । “जरांगे पाटील आता शरद पवारांचे बाप झालेत”, प्रकाश आंबेडकर यांचे सर्वात मोठे वक्तव्य!

जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्यास सुरवात केली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर ६ पोलिसांसह ४ नागरिक जखमी झाले आहेत. जनविश्वास यात्रेदरम्यान तेजस्वी यादव यांचा ताफा पूर्णियातील बेलौरी येथून जात होता. यावेळी हा अपघात झाला आहे.

Mahesh Gaikwad । ब्रेकिंग! महेश गायकवाड रुग्णालयातून घरी दाखल मात्र पुन्हा तब्येत खालावली, तातडीने उपचार सुरु

विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव पूर्णिया, अररिया, किशनगंजच्या जनविश्वास यात्रेवर आले होते यावेळी हा अपघात झाला आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास ते पूर्णियाहून कटिहारकडे जात होते. तेव्हा हा अपघात झाला. अपघातानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला आहे.

Manoj Jarange । सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे यांना मोठा धक्का; मराठा समाजानेच केले जरांगेंविरोधात आंदोलन

Spread the love